ग्रामसेवक आंदोलन काळातील वेतानाला मुकणार

0

रत्नागिरी : जिल्हयातील ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केल्यामुळे गावगाडा ठप्प झाला आहे. कामबंद आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांचे ‘ना काम ना वेतन’ या धोरणानुसार कामबंद कालावधीमधील वेतन मिळणार नसल्याचे शासनाने सांगितले आहे. यामुळे जिल्हयातील ६५० जणांना याचा फटका बसणार आहे. ग्रामसेवकांचे विविध मागण्यांसाठी ९ ऑगस्टपासून राज्यव्यापी असहकार आंदोलन सुरू होते. मात्र शासनाने याकडे लक्ष न दिल्याने २२ ऑगस्टपासून कामबंद आंदोलनाचे हत्यार उगारण्यात आले आहे. आंदोलनात जिल्ह्यातील मंडणगड ४९, दापोली १०६, खेड ११४, चिपळूण १३०, गुहागर ६६, संगमेश्वर १२६, रत्नागिरी ९४, लांजा ६०, राजापूर १०१ अशा एकूण ८४६ ग्रामपंचायतींमधील ६५० ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी या संपात सहभागी झाले आहेत. शासनाने गेल्या काही वर्षापासून ‘ना काम ना वेतन’ हे धोरण राबवत कर्मचाऱ्यांच्या मानधनाला कात्री लावली जात आहे. शासनाने हे धोरण ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना लावल्याने जिल्ह्यातील ६५० जणांना याचा फटका बसणार आहे. कामबंद आंदोलन कालावधीत संपूर्ण वेतन शासन देणार नाही.या आंदोलनाने मात्र जिल्हयातील ग्रामीण विकासाचा कारभार मात्र ठप्प बसला आहे. विकासकामांना खिळ बसली आहे. शासनाने ग्रामसेवकांच्या संपाबाबत तोडगा काढावा.लवकरचविधाससभेची आचारसंहिता लागणार आहे. मात्र या आंदोलनामुळे विकासकामांच्या विविध निविदा काढण्याचे काम ठप्प झाले आहे. आचारसंहितेपूर्वी संप मिटला नाही तर ग्रामपंचायतींच्या आर्थिक विकासकामांना खिळ बसणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्यांचे म्हणणे आहे.LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here