कोकण रेल्वेकडून प्रवाशांसाठी विशेष सूचना

0

◼️ वेळेत स्थानकात या अन्यथा तुमची ट्रेन चुकू शकते; आजपासून कडक अंमलबजावणी

रत्नागिरी : वारंवार सूचना करून हि तपासणीकरीता रेल्वेच्या वेळेच्या पूर्वी स्थानकात उपस्थित न राहणाऱ्या प्रवाश्यांच्या बाबतीत कोकण रेल्वे आता कडक पाऊले उचलणार आहे. आजपासून उशिरा आल्याने तपासणी न होणाऱ्या प्रवाश्यांचा रेल्वेतील प्रवेश अडचणीत येणार आहे. कोकण रेल्वे आजपासून रत्नागिरी सिंधुदुर्गातील सर्वच स्थानकात या बाबतची कडक अंमलबजावणी करणार आहे. कोव्हिड चा धोका पूर्णतः टळलेले नाही या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे सर्व स्थानकांवर प्रवाश्यांची प्रवासापूर्वी आरोग्य व अन्य तपासणी करत आहे. याकरीता रेल्वेच्या निर्धारित वेळेपूर्वी प्रवाश्यांनी किमान एक तास आधी स्थानकात उपस्थित रहावं असे आव्हान गेले काही दिवस कोकण रेल्वे करत आहे. या आवाहनाला प्रवाश्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. मात्र काही ठराविक प्रवासी ऐनवेळी स्थानकात दाखल होत असल्याने रेल्वे सुटण्याच्या वेळी गोंधळाची स्थिती निर्माण होते आहे. आता अशा प्रवाश्यांच्या बाबतीत कठोर धोरण अवलंबले जाणार आहे. यामुळे ऐनवेळी येणाऱ्या प्रवाश्यांना ट्रेन च्या बाहेर रहावे लागण्याची भीती आहे. कोव्हिड चा प्रसार होऊ नये यासाठी कोकण रेल्वे सर्व त्या खबरदारी घेत आहे. केले जाणारे सर्व उपाय हे प्रवाश्यांच्या आरोग्याच्या हिताचे आहेत. या सगळ्या करीता कोकण रेल्वेचे सर्व कर्मचारी अधिकारी सर्व स्थानकात अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना प्रवाश्यांची साथ अपेक्षित आहे. त्यामुळे आजपासून तुम्ही जर कोकण रेल्वेने प्रवास करत असाल तर निर्धारित वेळे पूर्वी किमान पाऊण तास आधी रेल्वे स्थानकात पोहोचा, अन्यथा सुरक्षा तपासणी झाली नाही तर तुमची ट्रेन चुकू शकते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
12:31 PM 27-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here