दापोली : दापोली-कादिवली मार्गावर कोथळकोंड येथे मंगळवारी दि. ३ दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास स्वीफ्ट डिझायर कार व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. शैलेश शिवाजी मेस्त्री (२६, रा. माटवण) असे त्याचे नाव आहे. याबाबत दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, नीतेश रेवाळे रा. निगडे) हे आपल्या ताब्यातील स्वीफ्ट कारने कादिवलीहन दापोलीकडे येत असताना कोळथकोंड येथे भरधाव वेगाने एक दुचाकी येऊन त्यांच्या गाडीच्या उजव्या बाजूला धडकली. यावेळी रेवाळे यांनी तत्काळ स्थानिकांच्या मदतीने दुचाकीस्वार शैलेश याला दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शैलेश याला मृत घोषीत केले. अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मोहन पाटील करीत आहेत.
