बनावट किल्लीच्या सहाय्याने लॉकर मधून लांबवली ५० हजारांची रोकड

0

चिपळूण : बनावट किल्लीच्या सहाय्याने लॉजमधील लॉकर खोलून अज्ञाताने ५० हजार २०० रुपये लांबविल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शशिकांत गोविंद चिंगळे (रा. गिरगाव, मुंबई) यांनी या बाबत पोलिस स्थानकात फिर्याद दिली. श्री. चिंगळे हे २३ ऑक्टोबर रोजी शहरातील चिंचनाका परिसरातील आदर्श लॉजमध्ये राहत होते. यावेळी त्यांच्यासोबत दुसरी एक व्यक्तीही राहत होती. श्री. चिंगळे यांनी आपल्या ताब्यातील रोख रक्कम ५० हजार २०० रुपये लॉकरमध्ये ठेवली होती. दि. २४ रोजी रात्री ८ वाजता जेवण करण्यासाठी ते रूमबाहेर पडले होते. याचदरम्यान त्या रूममधील एक व्यक्तिही चेकआऊट करून रूम सोडून गेली होती. जेवण आटोपून चिंगळे हे जनरल रूममध्ये आले आणि झोपले. रविवारी सकाळी लॉकर उघडून पाहिले तर त्यामध्ये त्यांनी त्याची रक्कम आढळून आली नाही. मात्र, लॉकर सुस्थितीत होता तसेच त्या लॉकरची किल्ली श्री. पिंगळे यांच्याचकडे होती. त्यामुळे ते पैसे दुसऱ्या किल्लीच्या सहाय्याने काढून नेण्याचा संशय व्यक्त करत त्यांनी आपली फिर्याद चिपळूण पोलिस स्थानकात नोंदवली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस हे. कॉ. मोहिते करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:43 PM 27-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here