‘पावसाळा संपला तरी बेडकांची डराव-डराव संपली नाही’; खा. विनायक राऊत यांचे राणेंवर टीकास्त्र

0

रत्नागिरी : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यानंतर त्यांच्यावरही जोरदारही टीका झाली. यामध्ये भाजप नेते नारायण राणे यांनी ठाकरेंवर निशाणा साधत उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाला लायक नसल्याचं म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘पावसाळा संपला असला तरी या बेडकांची डरावडरावगिरी संपलेली नाही. पण त्यांच्या डराव-डराव गिरीला कोणी घाबरत नाही. येत्या काही काळात जनताच राणेंना त्यांची जागा दाखवून देईल’, असं खा. विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. ‘नारायण राणे तुम्हाला माझा एकच सल्ला आहे. तुम्ही मुख्यमंत्री होतात. मुख्यमंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीला तुम्ही उद्देशून वापरलेले शब्द न शोभणारे आहेत’, असंही खा. विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:02 PM 27-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here