राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत खाडे दाम्पत्याला सुवर्ण

0

कोल्हापूर : भोपाळ येथे सुरू असणार्‍या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कोल्हापूरचे जलतरणपटू दाम्पत्य वीरधवल व सौ. ऋजुता खाडे यांनी सुवर्ण पदकांची कमाई केली. 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत होणार्‍या या स्पर्धेत खाडे दाम्पत्य महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. 50 मीटर फ्री स्टाईल एकाच प्रकारात सुवर्ण पदक घेणारे हे देशातील पहिले दाम्पत्य ठरले आहे. तर, वीरधवलने 50 मीटर बटरफ्लाय प्रकारात 24.19 इतक्या वेळेसह दुसरे सुवर्ण पदक पटकाविले. ‘गोल्डन बॉय’ वीरधवल खाडे याने 50 मीटर फ्री स्टाईल प्रकारात 22.71 सेकंदाचा स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडत 22.44  सेकंदाचा नवा विक्रम प्रस्थापित केला. तर, याच प्रकारात त्याची पत्नी सौ. ऋजुता खाडे यांनी 50 मीटर फ्री स्टाईल प्रकारात 26.72 सेकंदाची वेळ नोंदविली. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here