महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्याच्या तयारीला लागा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना आदेश

0

मुंबई : महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुखांसोबत काल रात्री उशिरा पार पडलेली व्हिडीओ कॉन्फरन्स बैठक तब्बल तीन तास चालली. कोव्हिडच्या काळात सरकार आपलं काम करत आहे, पण पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना केल्या. टीकाकारांना टीका करु द्या, तुम्ही तुमचे काम करत राहा, असा सल्लाही ठाकरेंनी या संवादात दिल्याचे कळते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:42 PM 28-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here