“हॅट्स ऑफ…” म्हणत पंकजा मुंडेंकडून शरद पवारांचं कौतुक

0

पुणे : ऊसतोड कामगारांच्या संपाचा तिढा सोडवण्यासाठी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची देखील उपस्थिती होती. दरम्यान, शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या अधिकृत ट्विट खात्यावरून, ‘पवारसाहेब हॅट्स ऑफ. आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले,’ असा संदेश पोस्ट करत शरद पवारांचे कौतुक केले आहे. ट्विटमध्ये पंकजा मुंडे यांनी, ‘शरद पवार यांनी कोरोना संसर्गाच्या काळात राज्यातील अनेक शहरांना भेटी देऊन तेथील उपाययोजनांची पाहणी केली. याचाही उल्लेख करत कोरोनाच्या काळात इतका सगळा दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले,’ अशा शब्दांमध्ये शरद पवार यांच्या कामाचा आदर केला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:03 PM 28-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here