‘कोरोना गो’चा घेतला वसा, ग्रासले त्याच रामदासा; गृहमंत्र्यांकडून आठवलेंना ‘आठवले स्टाईल’ सदिच्छा

0

मुंबई : ‘गो कोरोना कोरोना गो’ असा नारा देणारे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सर्वांनीच काळजी व्यक्त केली आहे. काव्यात्मक अंदाजात प्रत्येक गोष्टीवर कोटी करणाऱ्या आठवलेंना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही हलक्या फुलक्या पद्धतीने काव्यात्मक सदिच्छा दिल्या आहेत. ‘कोरोना-गो’चा घेतला ज्याने वसा, ग्रासले त्याच कविमित्र रामदासा, धीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका, कोरोनात नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का’ असे ट्विट करत अनिल देशमुख यांनी रामदास आठवले यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:08 PM 28-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here