मराठीबद्दल तिरस्कार व्यक्त करणाऱ्या कुमार सानूंच्या मुलाविरोधात मनसे आक्रमक

0

मुंबई : यापूर्वीच्या सिझनप्रमाणेच सध्या बिग बॉसच्या चौदाव्या सीझनमध्ये वादग्रस्त वक्तव्यांना सुरुवात झाली आहे. त्यातच सध्याच्या घडीला गायक राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तांबोली यांच्या वादाची चर्चा सुरू आहे. पण जान कुमार सानूला या त्रिकुटाचा वाद अडचणीत आणणारा ठरू शकतो. निक्की आणि राहुलशी वाद घालताना त्याने मराठी भाषेबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्याचा महाराष्ट्रातील अनेकांनी निषेध केला आहे. केवळ मराठी कलाकारांनीच नव्हे तर राजकीय पक्षांनी देखील जान कुमार सानूला लक्ष्य केले आहे. कुमार सानूंच्या या मुलाला खास मनसे शैलीत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही धारेवर धरले आहे. ‘जान कुमार सानू. मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी. मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला’, असं ट्विट त्यांनी केले आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:35 PM 28-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here