“नारायण राणेंनी आता रामदास आठवलेंकडे संपर्क साधावा”

0

विधानसभेच्या तोंडावर कोकणात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी नारायण राणेंच्या शिवसेनेत घेण्याबाबत वक्तव्य केलं आहे. त्यांनी नारायण राणेंना सल्ला दिला आहे.

HTML tutorial

नारायण राणे आता कुठल्या पक्षात जाणार याची मला माहिती नाही, मात्र राणेंनी आता रामदास आठवले यांच्याकडे संपर्क साधावा, असा टोला कदम यांनी लगावला. यावेळी रामदास कदमांनी नारायण राणेंचा खरपूस समाचार घेतला आहे.

नारायण राणे यांना शिवसेनेत घेण्यास शिवसैनिकांचा प्रचंड विरोध आहे. भाजपमध्ये ते गेले तर युती करायची की नाही याबाबत सुद्धा शिवसैनिकांच्या मनात खदखद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here