भारत हल्ला करेल या भीतीपोटी झाली होती अभिनंदन यांची सुटका; पाकच्या माजी मंत्र्याचा खुलासा

0

नवी दिल्ली : भारताचा पाकिस्तानात असलेला दरारा पुन्हा एकदा दिसून आला आहे. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका भारत हल्ला करेल या भीतीपोटीच करण्यात आल्याचा खुलासा पकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद असिफ यांनी केला आहे. असिफ यांनी पाकिस्तानच्या संसदेत केलेल्या वक्तव्यामुळे भारताचा दरारा आणि पाकिस्तानच्या मनात असलेली भीती स्पष्ट झाली आहे. 26 फेब्रवारी 2019 मध्ये भारतील सैन्याकडून बालाकोटमध्ये एअरस्ट्राईक करण्यातं आलं. त्यावर पाकिस्तानी लष्कर किंवा तिथले सरकार कायम प्रश्न उपस्थित करत असले तरी त्यांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेला खुलासा पाकिस्तानच्या मनातील भारतीय लष्कर आणि मोदी सरकारबद्दलची भीती स्पष्ट करतो. ‘विंग कमांडर अभिनंदन यांना भारताबद्दल असणाऱ्या भीतीपोटी सोडण्यात आलं. पाकिस्तानी सरकारच्या मनात भारताबद्दल अशी काही भीती होती, की त्यांनी कुठलाही वेळ वाया न घालवता विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना तत्काळ मुक्त केलं आणि भारतासमोर गुडघे टेकले. भारताला खूश करण्यासाठी अभिनंदन यांना सोडण्यात आल्याचंही ख्वाजा मोहम्मद आसिफ म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:46 AM 29-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here