जिल्ह्यातील स्थानिकांच्या मच्छीमार नौका बंदरातच उभ्या आहेत. परंतु, मुंबई, कच्या ट्रॉलिंग मासेमारी करणार्या मच्छीमार नौका जिल्ह्याच्या समुद्रात घुसखोरी करून बेबी म्हाकूळ जाळ्यात पकडत आहेत. इतकेच नव्हे तर हे म्हाकूळ येथील मच्छी दलालांच्या जीवावर मिरकरवाडा, मिर्या बंदरावर उतरवून घेऊन लाखो रुपयांचा मलिदा कमवत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात 4 हजारांपेक्षा अधिक पर्ससिन नेट आणि पारंपरिक मच्छीमार नौका पाऊस, वादळीवारे आणि समुद्रातील पाण्याला असलेल्या करंटमुळे गेल्या पाच दिवसांपासून समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नाहीत. मात्र, कर्नाटक आणि मुंबईतील ट्रॉलिंग नौका निर्धास्तपणे जिल्ह्याच्या समुद्रात मासेमारी करत आहेत.
