रेशन दुकानदार संघटनेच्या राजापूर तालुकाध्यक्षपदी महेश नकाशे

0

राजापूर : रास्त दर धान्य दुकानदार संघटना, राजापूरच्या तालुकाध्यक्षपदी चिखलगाव येथील महेश नकाशे यांची तर सचिवपदी दीपक जाधव, खजिनदारपदी चंद्रकांत जड्यार यांची सर्वानुमते निवड झाली आहे. तालुक्यातील रास्त धान्य दुकानदारांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी दुकानदारांनी एकत्रित येत संघटना गठीत केली आहे. संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची मावळते अध्यक्ष उल्हास प्रभुदेसाई यांच्या अध्यतेखाली झालेल्या बैठकीमध्ये निवड करण्यात आली. यावेळी निवडण्यात आलेली कार्यकारणीत अध्यक्षपदी महेश नकाशे, उपाध्यक्षपदी नरेश शेलार, उदय कोलते, सचिवपदी दीपक जाधव तर सहसचिवपदी विजय बाणे यांची निवड झाली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:04 PM 29-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here