कोकणात येण्या-जाण्यासाठी मुंबई- गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी असलेला रस्ता खचलाआहे. ऐन गणेशोत्सव कालावधीत हा मार्ग खचल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या आधीच कशेडी घाट पोलादपूरच्या दिशेला काही ठिकाणी खचला आहे.
काही नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास या महाड-नातूनगर-विन्हेरे मार्गाचा पर्यायी वापर केला जातो. मात्र नातूनगर – विन्हेरे मार्गे महाडकडे जाणारा रस्ता महाड भागात खचल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. प्रशासनाकडून या मार्गाचा वापर करू नये, असेसांगण्यात आले आहे.
