रत्नागिरी पोलीस वसाहतीत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

0

रत्नागिरी पोलीस मुख्यालयातील वसाहतीत एका एकवीस वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आरती चव्हाण असे या तरुणीचे नाव असून मूळची सांगलीची होती.

आरती चव्हाणची बहीण पोलिसात असल्याने ती बहिणीच्या पोलीस वसाहतीतील खोलीत राहत होती. घरात दुसरे कुणी नसताना आरतीने दरवाजा बंद करून गळफास लावून आत्महत्या केली. तिची बहीण घरी आल्यावर खोलीचा दरवाजा उघडत नसल्याने तिने आजूबाजूच्या लोकांना बोलावले. त्यानंतर दरवाजा उघडल्यावर आरतीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here