मुंबई इंडियन्सचा विक्रम; जगातील तगड्या संघांना टाकले मागे

0

 Indian Premier League ( IPL 2020)च्या १३व्या पर्वातील प्ले ऑफचं तिकिट पक्क करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या आव्हानाचा दिल्ली कॅपिटल्सला सामना करावा लागणार आहे. सलग तीन पराभवांमुळे DCनं प्ले ऑफचा स्वतःचा मार्ग खडतर बनवला आहे. त्यामुळे त्यांना उर्वरित दोन सामन्यांत विजय मिळवावाच लागेल. १२ सामन्यांत ७ विजयांसह त्यांच्या खात्यात १४ गुण आहेत, एक विजय त्यांना पुरेसा असला तरी अन्य संघाची घोडदौड पाहता त्यांच्यासाठी आता एकही चूक महागात पडणारी आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रमथ क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

IPLमध्ये सलग दोन शतक मारण्याचा विक्रम करणारा शिखर धवन सलग दुसऱ्या सामन्यात भोपळ्यावर माघारी परतला. ट्रेंट बोल्टनं पहिल्याच षटकात त्याला माघारी पाठवलं. सूर्यकुमार यादवनं सुरेख झेल टिपला. पृथ्वी शॉचा निराशाजनक कामगिरीचा कित्ता याही सामन्यात कामय राहिला. बोल्टनं त्याला १० धावांवर बाद केले. दिल्लीचे दोन्ही सलामीवीर १५ धावांवर माघारी परतले होते.

आयपीएलच्या इतिहासात २०० सामने खेळण्याचा पहिला मान मुंबई इंडियन्स पटकावणार आहे. आतापर्यंत खेळलेल्या १९९ सामन्यांपैकी मुंबई इंडियन्सनं ११५ विजय मिळवले आहेत, तर ८० वेळा त्यांना पराभवाचं तोंड पहावं लागलं. दोन सामने टाय झाल्यानंतर जिंकले, तर दोन टाय सामन्यांत पराभव झाला. मुंबई इंडियन्सनं सर्वाधिक ट्वेंटी-20 सामन्यांचा विक्रमही नावावर केला. त्यांचा हा २२२ वा ट्वेंटी-20 सामना आहे. सोमरसेट ( २२१), हॅम्पशायर ( २१७), ससेक्स ( २१२) आणि सरे ( २११) यांचा क्रमांक त्यानंतर येतो.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:02 PM 31-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here