काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांची रत्नागिरी जिल्हाध्यपदावरून उचलबांगडी करण्यात आली असून अॅड.विजय भोसले यांची निवड करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा बदल केला आहे. रमेश क़दम यांच्या कार्यपद्धतीबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांनी सातत्याने नाराजी व्यक्त केली होती.लोकसभा निवडणूकीत ते काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारातही फारसे न दिसल्यामुळे त्यांच्याबाबतीत नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
