‘रामदास कदम बुवाबाजी आणि जादुटोणा करणारे नेते’

0

दापोली: राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम हे बुवाबाजी आणि जादूटोणा करणारे नेते असल्याचा घणाघाती आरोप दापोली मतदार संघातील शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी केला आहे. रामदास कदम आणि सूर्यकांत दळवी हे एकाच पक्षात असले, तरीही त्यांच्यातील विस्तव काही जात नाही. मात्र, सूर्यकांत दळवी यांनी रामदास कदम यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. दरम्यान रामदास कदम यांनी चारवेळा पक्षाच्या विरोधात काम केले असून, त्यांनी दापोली मतदारसंघात घुसखोरी करू नये. असा इशाराही त्यांनी कदम यांना दिला.रामदास कदम हे जादूटोणा करणाऱ्या बुवांना सोबत घेऊन फिरतात. कदम यांना विरोधी पक्षनेता होण्यासाठी देखील आमच्यासोबत भगत दिला होता. दर अमावस्येला रामदास कदम भगतगिरी करायचे, असा दावा देखील सूर्यकांत दळवी यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here