मुंबई : शनिवारी प्रसिद्ध कथक नर्तक पं. विरू कृष्णा यांचे मुंबईमध्ये निधन झाले आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या कडून कथक नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते. अभिनेत्री जूही चावला, कतरिना कैफ, त्याचप्रमाणे करणवीर बोहरा हे त्यांचे शिष्य. नृत्यासोबतच त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये कमालीच्या भूमिका साकारल्या होत्या. त्याच्या अचानक जाण्यामुळे कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
‘राजा हिंदुस्तानी’, ‘इश्क’, ‘हम हैं राही प्यार के’ आणि ‘अकेले हम अकेले तुम’ अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांचे मनोरंजन केले होते.
