काँग्रेसशी युती केली तरच आम्ही आंबेडकरांसोबत

0

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत माझे व्यक्तिगत कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. मात्र आंबेडकरांनी काँग्रेस, राष्ट्रवादी व डाव्या विचारसरणीच्या पक्षांसोबत युती केल्यास मी आंबेडकरांच्या सोबत जाण्यास तयार असल्याची स्पष्टोक्ती माजी आमदार लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मागील लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही स्वबळावर निवडणूक लढविली. परंतु त्याचा फायदा भाजपला होत असल्याचे लक्षात आल्यानंतरच मी प्रकाश आंबेडकरांच्या पक्षातून बाहेर पडलो आहे. भाजपला सत्तेपासून हटविणे हा आमचा मुख्य उद्देश असल्याचे माने म्हणाले.

आगामी होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करणार असून दोन दिवसांत त्याबाबत बैठक होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here