94 टक्के बालकांना शाळेची ओढ…

0

◼️ आयटीसी जेलिमल्स, इन्फोलीपच्या सर्व्हेक्षणात उघड

मुंबई : कोरोना प्रादुर्भाव आणि इतर काही कारणांमुळे शिक्षण घेता येत नसलेल्या 94 टक्के बालकांना शाळेची ओढ लागली आहे. तसेच गेल्या सात-आठ महिन्यांपासून वर्ग मित्रमैत्रिणींपासून दूर राहिलेल्या बालकांना त्यांनादेखील भेटायचे आहे. आयटीसी जेलीमल्स आणि इन्फोलिपने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. जेलीमल्सने नुकतेच व्हिटॅमिन सी व झिंक यांनी समृद्ध असलेली जेलीमल्स इम्युनोझ ही जेलीज बाजारात आणली आहे. त्याचबरोबर सध्याच्या नवीन जीवनशैलीबाबत मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि कोलकाता येथील 8-12 वयोगटातील लहान मुलांचा सर्व्हे केला. यात 94 टक्के मुलांना ‘शाळेत जायला न मिळाल्याचे’ दुःख वाटतं, तर 90 टक्क्यांहून अधिक मुलांना ‘मित्रांना प्रत्यक्षात भेटण्याची’ खूप इच्छा आहे. या नवीन परिस्थितीत रोगप्रतिकारशक्तीला पाठबळ देण्याशिवाय पर्यायच नाही. मुलांना ‘सुपरपॉवर’ मिळाली तर तिचा वापर कोविड-19 पासून (लोकांना वाचवण्यासाठी 56 टक्के) आणि या आजारावर उपाय शोधण्यासाठी (18 टक्के)’ करू असे 74 टक्के मुलांनी सांगितले. आपल्याला आईवडील व कुटुंबीयांची खूप काळजी वाटते, असे 38 टक्के मुलांनी सांगितले. याशिवाय डॉक्टर्स, सैनिक, मित्र व प्राण्यांना वाचवणे; विषाणूचा संसर्ग तपासण्यासाठी चाचण्या करणे यांवर याखालोखाल भर देण्यात आला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:55 AM 03-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here