मुंबई – कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेल्या समितीनं काही दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदी ‘रवी शास्त्री’ यांची निवड केली. या नियुक्तीनंतर शास्त्री यांच्या पगारात तब्ब्ल 20 टक्क्यांची वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
यापूर्वी शास्त्री यांना वार्षिक 8 कोटी रुपये, एवढा पगार होता. पण आता त्यांना 20 टक्के अप्रायझल देण्यात आले आहे. त्यानुसार त्यांचा पगार आता जवळपार 10 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. आता 2021 सालापर्यंत शास्त्री हे भारताच्या प्रशिक्षकपदी कायम राहतील. 2017 मध्ये याआधी रवी शास्त्री यांची निवड झाली होती.
दरम्यान, रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात टीम इंडियाने 21 कसोटी सामने खेळले, त्यातील 13 सामन्यात विजय मिळवला.
