धनत्रयोदशीनिमित्त स्थानिक सुटी जाहीर

0

रत्नागिरी : जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी शुक्रवारी 13 नोव्हेंबर 2020 रोजी धनत्रयोदशी निमित्त अधिसूचना ससाशा/जीबी-अेके-३/स्था.सु./2020, दि.02 नोव्हेंबर 2020 अन्वये जिल्हयातील महसूली हद्दीमध्ये असलेल्या शासनाच्या सर्व खात्यातील कार्यालयांकरिता स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.

शासन ठराव राजनैतिक व सेवा विभाग क्र.पी-१३/दोन/बी/,दि. 16 जानेवारी 1958 व दिनांक 06 ऑगस्ट 1958 अन्वये जिल्हयातील महसूली हद्दीमध्ये असलेल्या शासनाच्या सर्व खात्यातील कार्यालयाकरिता तीन स्थानिक सुट्टया जाहीर करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आला आहे. या अधिकारांचा वापर करुन जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी सन 2020 मध्ये तीन स्थानिक सुट्टयांपैकी 09 मार्च 2020 रोजी होळी या सणानिमित्त व 27 ऑगस्ट 2020 रोजी ज्येष्ठा गौरा विसर्जन या सणानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर केली होती. उर्वरित एक स्थानिक सुट्टी शुक्रवार 13 नोव्हेंबर 2020 रोजी धनत्रयोदशी निमित्त जाहीर केली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
12:55 PM 03-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here