गुहागर येथे ‘ओबीसी आरक्षण बचाव’ आंदोलन

0

गुहागर : आज गुहागरमध्ये गुहागर तहसील कार्यालय येथे ओबीसीच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन करण्यात आले. यावेळी गुहागर तहसीलदार यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ओबीसी कल्याण मंत्री यांचे नावे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये जातिनिहाय जनगणना करण्यात यावे, ओबीसीमध्ये मराठा आरक्षण नको, जातनिहाय जनगणना केल्याने यातून ओबीसीची प्रत्यक्ष संख्या उपलब्ध होईल. त्यानुसार आरक्षण शिष्यवृत्ती सरकारी लाभ व अन्य सुविधा ओबीसींना किती मिळत होत्या, किती दिल्या पाहिजेत याची स्पष्टता येईल. आर्थिक विकास महामंडळ यांना भरीव आर्थिक तरतूद करण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी, सर्व प्रकारच्या सेवा भरतींवरील स्थगिती उठवावी. भरती प्रक्रिया त्वरित सुरू करावी आज सरकार ओबीसीला असलेल्या 19 टक्के आरक्षणामध्येच मराठा समाजाला आरक्षण देऊ करत आहे हे आम्हाला नको या विरोधात आम्हाला तीव्र आंदोलन करण्याची वेळ सरकारने आणू नये आदी मुद्द्यांचा समावेश आहे. ओबीसी संघर्ष समन्वय समिती गुहागर यांच्यावतीने ओबीसी मध्ये समावेश असलेल्या सर्व समाजाला बरोबर घेऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी ओबीसी संघर्ष समन्वय समिती गुहागरचे निमंत्रक पांडुरंग पाते, कृष्णा वने, रामचंद्र हुमणे, तुकाराम निवाते, महेश नाटेकर, राजेश बेंडल, संतोष जैतापकर, निलेश मोरे, नेत्रा ठाकूर, नीलेश सूर्वे, अरविंद पालकर, जनार्दन आंबेकर, गौरव वेल्हाळ, सुधीर कदम, शशिकांत पवार, नरेश नेटके, पूर्वी निमुंणकर, अजित साळवी, सुनील नाटूस्कर, मंगेश मोरे, प्रकाश कारेकर, विजय वैद्य आधी बहुसंख्य प्रमुख मंडळी उपस्थित होती.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:08 PM 03-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here