घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

0

रत्नागिरी : घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीला यश आले आहे. खेडशी नॅनोसिटी येथे राहणार्‍या श्रुती लांजेकर यांच्या बंद फलॅट फोडून 2 नोव्हेंबर रोजी चोरट्याने 2 लाख 27 हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केले. या चोरीचा गुन्हा ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. चोरीच्या घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळी जाऊन तपास करायला सुरुवात केली. 3 नोव्हेंबर रोजी संशयीत आरोपी निलेश विजय मोहिते (वय -29, रा. नॅनोसिटी, खेडशी) याला रेल्वेस्थानकाजवळ अटक केली. पोलिसांच्या चौकशीनंतर निलेश मोहिते याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यात असलेल्या बॅगेतून चोरीला गेलेल्या मालापैकी सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे दोन हार, सोन्याची अंगठी, कर्णफुल असा एकूण 2 लाख 27 हजार रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता निलेश मोहिते याने 21 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान खेडशी, गयाळवाडी, कापडी एन्क्लेव्ह येथील बंद फलॅट फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरल्याचे समोर आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरिक्षक हेमंतकुमार शहा, संदीप कोळंबेकर, संजय कांबळे, सुभाष भागणे, शांताराम झोरे, प्रशांत बोरकर, नितीन डोमणे, राकेश बागुल, आशिष शेलार, विजय आंबेकर, उत्तम सासवे, अमोल भोसले, दत्ता कांबळे यांनी केली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:37 PM 03-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here