बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान अनेकवेळेस वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मात्र तरिही त्याचे फॅन्स त्याच्यावरचे प्रेम जराही कमी करत नाहीत. सलमान खानने काहीही केले तरी त्याचे फॅन्स त्याला पाठिशी घालतात.
मात्र आता सलमानचा एक फॅन त्याच्यावर भयंकर नाराज झाला आहे. सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला अहे. हा व्हिडीओ गणपती पूजेच्यावेळचा आहे.
यावेळी सलमान सिगारेट ओढताना दिसतो आहे. सलमानची बहिण अर्पिताने बसवलेल्या गणप्तीच्या पूजेच्यावेळची हा व्हिडीओ शुट केला गेला होता. गणपतीच्या पूजेच्यवेळी सिगरेट ओढण्यावरून सलमानवर त्याचे फॅन नाराज झाले आहेत.
‘अरे शर्म करो, भाई’ अशा शब्दांमध्ये एका फॅनने या व्हिडीओवर कॉमेंट केली आहे.
