वाहनांची विक्री वाढवण्यासाठी सरकार आणणार  ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’ – नितीन गडकरी

0

वाहन उद्योग क्षेत्रातील मंदी दूर करण्यासाठी सरकार ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’ आणणार आहे. ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’ म्हणजे ठराविक काळानंतर वाहन मालकाला त्याची गाडी वापरता येणार नाही. ते वाहन मोडीत निघेल. मोदी सरकारच्या १०० दिवसांच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गडकरी यांनी हे विधान केले. ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’मुळे वाहनांची विक्री वाढेल तसेच भारत वाहननिर्मिती क्षेत्रात जगातील अग्रगण्य बाजारपेठ बनेल” असे गडकरींचे म्हणणे आहे.

भारतातील वाहन उद्योग क्षेत्र सध्या मोठया मंदीचा सामना करत आहे. वाहनांची विक्री मोठया प्रमाणात घटली आहे. वाहन निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्यांना त्यांच्या कारखान्यातील उत्पादन काही दिवसांसाठी बंद ठेवावे लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here