मुंबई काँग्रेसला एका दिवशी दोन धक्के बसले आहेत. आज सिनेकलाकार उर्मिला मातोंडर हिने काँग्रेस पक्षातील सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्या पाठोपाठ काँग्रेसचे मुंबईतील वजनदार उत्तर भारतीय नेते कृपाशंकर सिंह यांनी देखील पक्षाला रामराम ठोकला आहे. दिल्ली येथे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याजवळ त्यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान, बुधवारी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा देखील सुरु आहे. एकेकाळी मुंबई काँग्रेसवर वर्चस्व राखणारे कृपाशंकर सिंह गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या संपर्कात होते.
