चोरट्याने घरफोडी करून दागिने व रोख रकमेसह दागिन्यांची पावतीही नेली चोरून

0

चिपळूण : शहरातील मुरादपूर येथे दोन लाखांची घरफोडी झाल्याप्रकरणी रंजनी चंद्रकांत कदम (वय ४८, रा. अमेय पार्क, मुरादपूर) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २ नोव्हेंबर २०२० रोजी रात्रीच्या वेळी घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. कदम या घराला कुलूप लावून बाहेर गेल्या असता अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाच्या लॅचला चावी लावून दरवाजा उघडून आत प्रवेश करून लोखंडी कपाटातील लॉकर तोडला. त्यातील दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रकमेसह दागिन्यांची पावतीही चोरून नेली. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक बेग करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:27 AM 05-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here