बिबट्याचा बंदोबस्त करण्याची राजापूर नगराध्यक्षांची वन विभागाकडे मागणी

0

राजापूर : मुक्त वावर आणि शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ला करून त्यांना मारून राजापूर शहरात दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी वन विभागाकडे केली आहे. शहरात वावर असलेल्या दिवटेवाडीसह इतर भागात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.

जंगलतोडीमुळे नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्याने जंगली श्वापदांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविला आहे. त्यात बिबट्यांचे प्रमाण अधिक आहे. भक्ष्य मिळविण्याच्या उद्देशाने पाळीव प्राण्यांसह माणसांवरही बिबट्याचा हल्ला होण्याच्या प्रमाण वाढले आहे. राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात ठिकठिकाणी दर्शन होणार्याा बिबट्यांनी आता शहराकडे आपला मोर्चा वळविला आहे. तालुक्यातील धोपेश्वणर, आडिवरे, कशेळी आदी ग्रामीण भागात रात्री रस्ता ओलांडताना वा जंगलात बिबट्याचा वावर असल्याचे अनेकवेळा लोकांच्या निदर्शनास आले आहे. धोपेश्व्रच्या जंगलात काही महिन्यांपूर्वी एका शेतकर्यांलच्या जनावरांना बिबट्याने मारले. शहरातील दिवटेवाडीसारख्या गजबजलेल्या वस्तीमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. लोकवस्तीमधून बिनदिक्कतपणे फिरतानाचे बिबट्याचे दर्शन काही लोकांना अनेकवेळा झाले आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी बिबट्याने दिवटेवाडीतील रामचंद्र शिंदे या शेतकर्यामच्या गाईची शिकार बिबट्याने केली. त्यामुळे लोकांच्या भीतीमध्ये अधिकच भर पडली आहे. बिबट्याने आता घरातील पाळीव मांजरांनाही लक्ष्य केले आहे. दिवटेवाडीच्या वरच्या भागातील लोकवस्तीमधील सुमारे सात-आठ मांजरांना बिबट्याने आजपर्यंत पळवून नेल्याची माहिती नागरिकांनी दिली. बिबट्या शिकरीसाठी मांजरे आणि शेतकर्यांटच्या गाईंनाही लक्ष्य करत आहे. भविष्यात त्याने माणसावर हल्ला करण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. राजापूर शहरात मुक्तपणे फिरणाऱ्या या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नगराध्यक्ष अॅड. खलिफे यांनी वन विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:21 PM 05-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here