मुख्यमंत्री 17 रोजी महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने रत्नागिरी दौर्यावर येत असतानाच, शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने शनिवार दि. 14 सप्टेंबर रोजी रत्नागिरी दौर्यावर येत आहेत. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह पसरला आहे. जन आशीर्वादच्या निमित्ताने तीन दिवस आदित्य ठाकरे कोकण दौरा करणार आहेत.
विदर्भ, मराठवाड्याला भेट दिल्यानंतर युवासेनाप्रमुख दि. 14, 15 व 16 सप्टेंबर रोजी कोकण दौर्यावर येत आहेत. 14 सप्टेंबर रोजी गोवा विमानाने उतरल्यानंतर ते थेट सावंतवाडी, कणकवली, कुडाळमार्गे वेंगुर्ला येथे येणार आहेत. याठिकाणी कार्यकत्यार्ंशी संवाद साधत, आदित्य ठाकरे राजापूर, लांजा मार्गे रत्नागिरीत येणार आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी येथे जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने शिवसैनिक व जनतेशी चर्चा करणार आहेत. हा मेळावा सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान होणार आहे.
कोकणात गेल्या दोन महिन्यात तब्बल बारा वेळा राजापूर, चिपळूण, खेडमध्ये पूर आला. या भागातील जनतेशीही ते चर्चा करणार आहेत. 15 सप्टेंबर रोजी ते चिपळूण व खेडमधील कार्यकत्यार्ंशी संवाद साधून रायगडकडे रवाना होणार आहेत.
आ. उदय सामंत यांच्यावर या दौर्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मंगळवारी रत्नागिरी येथे पदाधिकार्यांची बैठक पार पडली. यावेळी आ. सदानंद चव्हाण, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख सचिन कदम व विलास चाळके, जि. प. अध्यक्षा स्वरुपा साळवी यांच्यासह जिल्हा परिषदेचे सभापती, पंचायत समित्यांचे सभापती या बैठकीला उपस्थित होते.
