कणकवली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील हे रविवार दि. ८ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून त्यांचे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खारेपाटण येथे सकाळी ९.३० वाजता स्वागत करण्यात येणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली आहे. त्यांच्या उपस्थितीत रविवारी दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकानिहाय शरद कृषी भवन येथे बैठका होणार आहेत. असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:05 PM 06-Nov-20