‘त्या’ विद्यार्थ्यांची परीक्षा दिवाळीनंतर होणार : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

0

मुंबई : राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी त्यांनी अंतिम वर्ष परीक्षे संदर्भात माहिती दिली. दरम्यान, काही विद्यार्थ्यांना कंटेन्मेंट झोन, पूर आणि अन्य कारणाने परीक्षा देता आलेल्या नाहीत. त्यांची परीक्षा ही दिवाळीनंतर घेण्यात येणार असल्याचे श्री सामंत यांनी सांगितले

◼️ 13 विद्यापीठात अपवाद वगळता सगळ्या परीक्षा पार पडल्या आहेत. 2 लाख 50 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, 2 विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली आहे. पास होण्याची तयारी 93 टक्के आहे.

◼️ काही विद्यार्थ्यांना कंटेन्मेंट झोन, पूर आणि अन्य कारणाने परीक्षा देता आलेल्या नाहीत. त्यांची परीक्षा ही दिवाळीनंतर घेण्यात येणार

◼️ विद्यार्थ्यांचे पास होण्याचं प्रमाण हे 12 ते 13 टक्के वाढलं आहे.

◼️ कोणत्याही विद्यार्थ्याच्या प्रमाणपत्रावर कोविड -19 चा उल्लेख राहणार नाही

◼️ ऑनलाइन आणि ऑफलाईन परीक्षा घेऊनही चांगला निकाल लागल्याचं सगळ्या महाविद्यालयाने दाखवून दिलं आहे.

◼️ मुंबईत, पुणे, सोलापूर, नागपूर इथं बॅक फायर झालं त्याचसाठी समिती नेमली आहे. त्या कंपनीला आम्ही ब्लॅक लिस्ट मध्ये टाकणार आहे.

◼️ येत्या 8 ते 10 दिवसात ज्या सिस्टम डॅमेज झाल्या आहेत त्या का झाल्या हे चित्र स्पष्ट होईल. त्याबाबत सायबर सेल तपास करत आहे.

◼️ परीक्षेदरम्यान एकही विद्यार्थी बाधित झाला नाही.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:25 PM 06-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here