कोरेच्या करबुडे बोगद्याबाजूस असलेले ब्रेकर आणि ड्रिल मशीन चोरीला

0

रत्नागिरी : तालुक्यातील करबुडे येथील कोकण रेल्वे बोगद्याच्या बाजुस असलेल्या डोंगरावरील 80 हजार रुपयांचा ब्रेकर आणि 55 हजार रुपयांची हिल्ट्री कंपनीची ड्रिल मशीन असे एकूण 1 लाख 35 हजार रुपयांचे सामान अज्ञाताने लांबवले. चोरीची ही घटना 3 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान घडली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सिध्दांत सुहास सावंत (24,रा.लाजुळ बौध्दवाडी,रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, करबुडे येथील कोकण रेल्वे बोगद्यात रेल्वे रुळाच्या बाजुला असलेला डोंगर या मशीनरीने पोखरण्यात आलेला आहे. तिथे तयार करण्यात आलेल्या उघड्या पाकिटमधून अज्ञाताने ही दोन्ही मशीन्स चोरुन नेली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल साळवी करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:59 PM 06-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here