पत्नीला व मुलीला मारहाण; गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : शहरानजीकच्या भाटिमिर्‍या येथे किरकोळ कारणातून पत्नीला व मुलीला मारहाण करत पत्नीच्या हाताचा अंगठा चावून जबर जखमी केल्याप्रकरणी पतीविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी रात्री 10.30 वा.सुमारास घडली. सुर्यकांत रविकांत रांदपकर (37,रा.भाटीमिर्‍या,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे. त्याच्याविरोधात पत्नी श्रुती सुर्यकांत रांदपकर(35,रा .भाटीमिर्‍या,रत्नागिरी) हिने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार,बुधवारी रात्री सुर्यकांतच्या घरासमोर राहणारे कचरेकर यांच्या घरी काही खलाशी जमले होते. त्यांना पाहून सुर्यकांतने पत्नी श्रृतीला बोलावून तू या खलाशांना पाहून हसायचे असे सांगितले. त्यावर तीने कशाला लोकांना हसायचे, मला भानगडी नकोत, असे सांगितले. याचा राग आल्याने सुर्यकांतने पत्नी श्रुतील व मुलगी सिध्दीला मारहाण केली. त्यानंतर त्याने श्रृतीच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा चावा घेउन तिला गंभीर जखमी केले. याप्रकरणी अधिक तपास पोलिस नाईक जाधव करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:55 AM 07-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here