रत्नागिरी खबरदार आयोजित लहान मुलांसाठी किल्ले बनवणे स्पर्धा

0

रत्नागिरी : कोकणातील लहान मुलांच्या पारंपारिक कलागुणांना वाव मिळावा म्हणून रत्नागिरी खबरदार या दिवाळीत ‘छोटे किल्लेदार’ या नावाने किल्ले बनवणे स्पर्धा आयोजित करीत आहे. दिवाळीत आपल्या घराजवळ मातीचा किल्ला तयार करण्याची परंपरा आहे. विविध गड किल्यांच्या अभ्यास करून लहान मुले अनेक आकर्षक किल्ले तयार करतात. मागील अनेक दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व लहान मुले घरीच आहेत. या दिवाळीच्या मुहूर्तावर या सर्व वातावरणातून बाहेर पडण्यासाठी आम्ही या स्पर्धेचे आयोजन करीत आहोत. या स्पर्धेत रत्नागिरी शहर, कुवारबाव, मिऱ्या, भाट्ये, शिरगाव या शहर परिसरातील १६ वर्षाखालील मुले भाग घेऊ शकतात. शुक्रवार दिनांक १३ नोव्हेंबर पर्यंत या स्पर्धेत प्रवेश घेता येईल. रविवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी परीक्षक मंडळ परीक्षण करण्यासाठी आपल्या किल्ल्याच्या ठिकाणी भेट देईल. सर्व सहभागी स्पर्धकांना स्पर्धा सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल व सर्वोत्कृष्ठ ३ क्रमांकाना आकर्षक बक्षिसाने गौरवण्यात येणार आहे.

स्पर्धेत नाव नोंदवण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा
https://forms.gle/54v5ZmBfz5Mgc2gS8

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
2:26 PM 09-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here