रत्नागिरीत एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबासमवेत आक्रोश आंदोलन

0

रत्नागिरी : एसटी कर्मचारी अत्यावश्यक सेवेमध्ये काम करीत असूनही त्यांना ऑगस्टपासून तीन महिन्यांचे वेतन रखडल्याने त्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी आपापल्या घरांसमोर आक्रोश आंदोलन केले. सोमवारी सायंकाळी परिवहन मंत्र्यांनी पगार देण्याची घोषणा केली. ती आधीच केली असती, तर दोघा कर्मचाऱ्यांची आत्महत्या टळली असती, अशी प्रतिक्रिया आक्रोश करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

दिवाळीचा सण तोंडावर आलेला असतानाही एसटी प्रशासनाकडून वेतनाबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. कामगारांमध्ये प्रचंड असंतोष वाढल्याने सोमवारी प्रलंबित वेतन व इतर आर्थिक लाभ मिळण्यासाठी राज्यभरासह जिल्ह्यातील कर्मचार्यांलनी कुटुंबासह आक्रोश केला. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या आवाहनानुसार जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले. काही कर्मचार्यां नी ड्युटीवरून घरी गेल्यावर त्यांनी आक्रोश केला. सुट्टी असणार्यां नीही यात सहभाग घेतला. जिल्हाध्यक्ष राजेश मयेकर व सचिव संदेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात आंदोलन झाले. आंदोलकांवर कारवाई करण्याचा इशारा महामंडळाने दिल्यामुळे आंदोलक अधिकच संतापले आहेत. करोना विषाणूच्या महामारीत एसटी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावत होते. कामगिरी करीत असताना करोनामुळे बरेचसे कर्मचारी बाधित झाले असून ८० कर्मचारी मरण पावले. इतर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन नियमित मिळत असून महापालिका, बेस्टमधील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १५ हजार १० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर झाले. परंतु एसटी कर्मचारी राज्यभर अत्यावश्यक सेवेमध्ये काम करीत असूनही त्यांना ऑगस्ट २०२० पासून तीन महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. वेतनाबाबत संघटनेने वारंवार पत्र व्यवहाराद्वारे पाठपुरावा करूनही त्याची दखल एसटी प्रशासनाने घेतलेली नाही. त्यामुळे कामगारांत प्रचंड असंतोष वाढला असून प्रलंबित वेतन मिळण्यासाठी त्यांनी आपापल्या घरासमोर आक्रोश केला. वास्तविक एसटी कामगारांना नियमित वेतन देणे कायद्याने एसटी प्रशासनावर बंधनकारक आहे. कामगार करारातील मान्य केलेल्या तरतुदींनुसार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता व सण उचलही देणे आवश्यक आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या २ आणि ३ टक्के महागाई भत्त्याची थकबाकी अद्याप दिलेली नाही. शासकीय कर्मचाऱ्यांना डिसेंबर २०१९ पासून लागू करण्यात आलेला वाढीव ५ टक्के महागाई भत्ताही एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप लागू केलेला नाही. तो थकबाकीसह लागू करणे आवश्यक आहे. दरम्यान, आंदोलन सुरू असतानाच सायंकाळी परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी सोमवार सायंकाळपर्यंत एक महिन्याचे वेतन आणि दिवाळीच्या आधी दुसरे वेतन मिळेल, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी जाहीर केले. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारदेखील आर्थिक संकटात आहे. पण एसटी कर्मचाऱ्यांनी हताश होऊ नये. आत्महत्या करू नये, असे आवाहन केले. पूर्ण वेतन मिळावे, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. त्यासाठी बॅंकेकडे कर्ज मागितले आहे. राज्य शासनाला विनंती केल्याचे श्री. परब यांनी सांगितले. तीन महिन्यांचे थकलेले वेतन देण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू झाली. ती आधीच सुरू झाली असती, तर गेल्या दोन दिवसांत रत्नागिरीसह राज्यातील २ एसटी कर्मचाऱ्यांनी केलेली आत्महत्या टळली असती, अशी प्रतिक्रिया रत्नागिरीतील एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:29 AM 10-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here