ट्रेलरने केला सात दुचाकींचा चुराडा

0

चिपळूण : खडपोली एमआयडीसीत एका ट्रेलरने सात दुचाकींचा चुराडा केल्याची घटना काल सोमवारी सकाळी घडली. ट्रेलर मालकाने सर्व दुचाकींची भरपाई भरून देण्याचे कबूल केल्यामुळे हे प्रकरण जागेवर मिटले. कृष्णा केमिकल कंपनीच्या नव्या कंपनीत दुसऱ्या गेटसमोर सकाळी ११ वाजता हा प्रकार घडला. कंपनीच्या गेटवर सकाळी कामगारांनी दुचाकी उभ्या केल्या होत्या. त्याठिकाणी चालकाने ट्रेलर उभा केला. मात्र, ट्रेलर पार्किंग करताना हॅण्डबेल्ट उघडण्याचा विसरून गेला. उत्तरात असलेला ट्रेलर अचानक सुरू झाला आणि त्याच ठिकाणी उभ्या असलेल्या एकापाठोपाठ सात दुचाकी गाड्यांचा ट्रेलरखाली चुराडा झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात गाड्यांचे नुकसान झाले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:46 PM 10-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here