मिरकरवाडा येथे मोबाइल शॉपी फोडून लांबवले ५७ हजार

0

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा येथील मोबाईल शॉपी फोडून रोख 57 हजार रुपये लांबवले. या प्रकरणी इरफान अब्दुल लतीफ मस्तान (40, रा.पेठकिल्ला, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार सलमान लियाकत कोतवडेकर (रा.खडप मोहल्ला मिरकरवाडा, रत्नागिरी) यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार, मस्तान यांचे मिरकरवाडा येथे मोबाईलचे दुकान आहे. रविवारी मध्यरात्री दुकानाच्या छतावरील पत्रा उचकटून चोरट्याने दुकानात प्रवेश करत मोबाईल रिचार्ज व इतर साहित्यासाठी ठेवलेले रोख 57 हजार रुपये लांबवले. सोमवारी सकाळी मस्तान दुकान उघडण्यासाठी गेले असता हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:05 PM 10-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here