बिहार विधानसभा निवडणूकीत शिवसेनेची कामगिरी असमाधानकारक; ‘नोटा’पेक्षाही कमी मतं

0

पाटणा : बिहार विधानसभा निवडणूकीचा निकाल अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. भाजप-जेडीयू यांची एनडीए बिहारमध्ये मुसंडी मारताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलानुसार शिवसेनेची कामगिरी समाधानकारक नसल्याचं चित्र आहे. २३ पैकी २१ जागांवर तर शिवसेनेच्या वाट्याला ‘नोटा’पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. बिहार विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात शिवसेना हिरीरीने उतरली होती. मात्र सेनेला मतदारांनी नाकारल्याचे दिसत आहे. कारण शिवसेनेच्या ‘तुतारी वाजवणारा मावळा’ या चिन्हासमोरील बटणापेक्षा मतदारांनी ‘नोटा’चे बटण अधिक दाबले आहे. शिवसेनेच्या उमेदवारांना ०.०४ टक्के मतं मिळाल्याचं सुरुवातीच्या मतमोजणीत दिसत होतं. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार दुपारी १.४५ वाजेपर्यंत आलेल्या निकालाच्या कलांनुसार शिवसेनेला २३ पैकी २१ जागांवर ‘नोटा’पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. शिवसेनेने ५० उमेदवार देण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात २३ जागांवरच निवडणूक लढवली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:44 PM 10-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here