‘काँग्रेस हे बुडतं जहाज, गुजरात पोटनिवडणुकांचा निकाल हा ट्रेलर’

0

नवी दिल्ली : गुजरातमधील पोटनिवडणुकीत सर्व आठ जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे. तर आगामी पंचायत निवडणुका व 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा उत्कृष्ट प्रदर्शन करेल, असा विश्वास गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी व्यक्त केला आहे. रुपाणी यांनी काँग्रेसवर निशाणा साधत जोरदार हल्लाबोल केला आहे. “काँग्रेस हे बुडतं जहाज आहे, त्यांनी लोकांशी संपर्क गमावला आहे. सर्वत्र त्यांच्या विरोधात निकाल आहेत. हा नेतृत्व नसलेला पक्ष आहे. गुजरातमधील पोट निवडणुकांचे निकाल हा आगामी काळातील निवडणुकांचा ट्रेलर आहे” असं विजय रुपाणी यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:56 PM 10-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here