रोव्हज अव्हेन्यू कोर्टाने चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळला

0

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना आणखी एक धक्का बसला. रोव्हज अव्हेन्यू कोर्टाने चिदंबरम यांचा अर्ज फेटाळला आहे. चिदंबरम यांनी आयएनएक्स मीडिया प्रकरणात अंमलबजावणी संचनालयाकडे (ईडी) आत्मसमर्पण करण्यासंदर्भात केलेली याचिका कोर्टाने फेटाळली. चिदंबरम यांची याचिका फेटाळल्याने त्यांना तिहारमधील न्यायालयीन कोठडीत रहावे लागणार आहे. यापूर्वी गुरुवारी या अर्जावरील सुनावणी दरम्यान ईडीने म्हटले होते की सध्या पी. चिदंबरम यांना ताब्यात घेण्याची इच्छा नाही, परंतु गरज पडल्यास ईडी कोर्टात अर्ज करेल. दरम्यान, चिदंबरम यांनी ११ सप्टेंबर रोजी त्यांच्यावर दाखल केलेला खटला राजकीय हेतुने करण्यात आला आहे. माझ्यावरील आरोप हा आर्थिक गुन्हा नाही असे त्यांनी म्हटले होते. तसेच जामिनासाठी चिदंबरम यांनी बुधवारी (ता.११) दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. चिदंबरम यांनी कोर्टासमोर केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, या प्रकरणात (आयएनएक्स मीडिया प्रकरण) कोणताही सार्वजनिक निधी गुंतलेला नाही. तसेच देशाबाहेर पैसे गुंतवणूकीसह बँकांची फसवणूक ठेवीदारांची फसवणूक किंवा एखाद्या कंपनीचे पैसे चोरण्याचा प्रकार घडलेला नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here