कोकणातील चिरेखाणींना परवानगी : आमदार शेखर निकम

0

रत्नागिरी : कोकणात घरबांधणीसाठी आवश्यक असलेल्या चिऱ्यांचा पुरवठा करणाऱ्या चिरेखाणी सुरू करायला परवानगी मिळाली आहे, अशी माहिती चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी दिली. केंद्र शासनाकडून आलेल्या आदेशानुसार गौणखनिज म्हणून अधिसूचित केलेल्या ३१ गौणखनिजांच्या खोदाईला परवाने देणे बंद करण्यात आले होते. त्यामध्ये कोकणातील चिरेखाणींचा समावेश होता. या बंदीमुळे कोकणात घरबांधणीसाठी अत्यावश्यक चिरा जांभा दगड खाणींना परवानगी देणे बंद झाले होते. आमदार शेखर निकम यांनी गेला महिनाभर पाठपुरावा केल्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिरेखाणींना परवानगी देण्याचा आदेश मंगळवारी महसूल विभागाकडून देण्यात आला. खासदार सुनील तटकरे यांनी सुरुवातीपासूनच या विषयात लक्ष दिले. त्याचबरोबर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, राज्यमंत्री आदिती तटकरे यांचेही आपल्याला यात मोठे सहकार्य लाभले, असे श्री. निकम म्हणाले. कोकणातील सर्वच आमदारांनी चिरेखाणींना पूर्वीप्रमाणे अल्पमुदतीचे परवाने देण्याकरिता पाठपुरावा केल्याने यात मोठे यश आले आहे, असेही श्री. निकम यांनी आवर्जून नमूद केले. दरम्यान, पूर्वीप्रमाणे स्थानिक व्यक्तींसाठी चिरेखाणींना मंगळवारी परवानगी देण्यात आली. या दगडाचा वापर औद्योगिक कारणांसाठी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना चिरेखाणींना परवानगी देताना महसूल विभागाकडून करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:35 AM 11-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here