गर्दीचा फायदा घेत दागिने लांबवणाऱ्या टोळीच्या रत्नागिरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या

0

गणपती सणाचे अनुषंगाने रत्नागिरी जिल्हयामध्ये मोठया प्रमाणात जिल्हयाबाहेर नोकरीनिमित्त असलेले स्थानिक लोक हे आपले गावी येत असतात. त्यामुळे सदर कालावधीमध्ये एस.टी.स्टँड, रेल्वेस्टेशन या ठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी होत असते. या गर्दीचा फायदा घेवून पर जिल्हयातील/राज्यातील गुन्हेगार हे एस.टी.स्टँड, रेल्वेस्टेशन या ठिकाणी किंमती दस्तऐवज असलेल्या प्रवाशांना हेरुन त्यांचेकडील मौल्यवान चीजवस्तु व रोख रक्कम चोरीचे प्रकार मागील 10 दिवसामध्ये घडलेले होते. या प्रकारांना प्रतिबंध होणेकरीता व सदरचे गुन्हे उघडकीस येणेकरीता मा.पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे व मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.विशाल गायकवाड यांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना मार्गदर्शन करून सुचना दिलेल्या होत्या.
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.शिरीष सासने यांनी मागील 10 दिवसांमध्ये अशा प्रकारच्या चिपळुण एस.टी.स्टँड, खेड एस.टी.स्टँड, देवरुख एस.टी.स्टँड, रत्नागिरी रेल्वेस्टेशन या ठिकाणी घडलेल्या गुन्हयांची माहीती घेणेकरीता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस पथके तयार करून त्यांना सदर घटना दरम्यानची व घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेज चेक करणे, एस.टी.स्टँड, रेल्वेस्टेशन या ठिकाणी साध्या वेषामध्ये गस्त ठेवणेबाबत सुचना दिल्या. त्या प्रमाणे सदर पथकांनी याबाबतची माहीती संकलीत केलेली होती. त्याच प्रमाणे पोलीस निरीक्षक श्री.अनिल लाड, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे यांनी देखील त्यांचे स्तरावर एक पथक तयार करुन त्यांचे करवी देखील गुन्हेगारांचा शोध चालू होता.
अशाच प्रकारे दिनांक 12/09/2019 रोजी एक पथक रत्नागिरी शहरातील एस.टी.स्टँड व रेल्वेस्टेशन परिसरामध्ये गस्त करीत असताना रेल्वेस्टेशनमधील प्लॅटफॉर्म क्र. 1 या ठिकाणी मुंबईकडे जाणा­या बाजुस दोन स्त्रीया, 2 पुरुष व 1 लहान मुलगा असे त्यांचे सामानासह बसलेले दिसले. त्यांचे हालचालीबाबत सदर पथकास संशय आल्याने त्यांचे जवळ जावून त्यांना कोठे जाणार, कोठुन आलात याबाबत चौकशी केली असता, ते उडवाउडवीची उत्तरे देवू लागले. म्हणुन त्यांचेजवळ असलेल्या बॅगांमध्ये काय आहे याची खात्री केली असता त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम, मोबाईल हँडसेट असल्याचे दिसून आले. सदर दागिन्यांबाबत त्यांना समाधानकारक उत्तरे व स्पष्टीकरण देता न आल्याने त्यानंतर दोन पंचासमक्ष सदर महीला व पुरषांची व बॅगांची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्यांचेकडे 1041 ग्रॅम 28 मिली वजनाचे 29,85,848 रु. किंमतीचे सोन्याचे दागिने, 422 ग्रॅम 44 मिली वजनाचे 7920/- रु. किंमतीचे चांदीचे दागिने, 1000/- रु. किंमतीची 06 मनगटी घडयाळे, 14,700/- रु. किंमतीचे 10 मोबाईल हॅन्डसेट, 2,50,800/- रु. रोख रक्कम व 100/- रु. किंमतीचे लोखंडी कटर असा एकूण 32,60,368/- रु. किंमतीचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे. (यामध्ये एकुण 26 मंगळसुत्र, 11 सोन्याचे हार, 9 चैन, 34 कानातील जोड, 6 कानातील चैन जोड, 25 अंगठया, 7 सोन्याची पाने, 2 गंथनीमधील वाटया, 1 ब्रोसलेट, 19 नथ वगैरे आहेत.)
सदर कारवाई दरम्यान आरोपी – 1) शिवा राम साखरे, वय-35 वर्षे, 2) ज्योती शिवा साखरे, वय-25 वर्षे, 3) अंजु उर्फ पद्मा शिवा शेट्टी, वय-33 वर्षे, तिन्ही हुडको कॉलनी, मंगलुर पिर झोपडपट्टी, ता. मंगलुर पिर, जि.वाशिम 4) विजय नरेश ऊर्फ राहूल धारी, वय- 21 वर्षे, रा. घर नं. 2-11/5, मुकुंदवाडी, झोपडपट्टी, औरंगाबाद यांना ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांनी 1) खेड पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.214/2019 भादवि 379, 2) चिपळुण पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.227/2019 भादवि 379, 3) चिपळुण पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.229/2019 भादवि 379, 4) रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.365/2019 भादवि 379, 5) देवरुख पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.123/2019 भादवि कलम 379 या गुन्हयांची कबुली दिलेली आहे. तसेच सदर सर्व पाचही गुन्हयातील 100 टक्के मुळ माल नमुद आरोपीत यांचेकडून हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर आरोपीत यांचेकडून रत्नागिरी जिल्हयातील तसेच बाहेरील जिल्हयातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्या दृष्टीने तपास सुरु आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.विशाल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री.शिरीष सासने, रत्नागिरी शहर पो.स्टे.कडील पोलीस निरीक्षक श्री.अनिल लाड, सपोफौ तानाजी मोरे, सुभाष माने, पांडुरंग गोरे, पोहेकॉ संदीप कोळंबेकर, संजय कांबळे, शांताराम झोरे, राकेश बागुल, मिलींद कदम, सुभाष भागणे, संजय जाधव, राजेंद्र भुजबळराव, स्नेहल मयेकर, अपुर्वा बापट, विदया लांबोरे, नितीन डोमणे, पोना विजय आंबेकर, अरुण चाळके, सागर साळवी, रमीज शेख, अमोल भोसले, उत्तम सासवे, गुरु महाडीक, दत्ता कांबळे, संदीप मालप, वैदेही कदम, मधुरा गावडे, सांची सावंत, यांचेसह रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनकडील पोहेकॉ विकास चव्हाण, नितीन जाधव, रोशन सुर्वे, नंदकुमार सावंत यांनी केलेली असून सदर कारवाई दरम्यान पंच म्हणून 1) श्री.केरबा मारुती सालेगावे लिपीक, कृषि कार्यालय रत्नागिरी 2) श्रीम.मंगला जयदत्त नाईक (सामाजिक कार्यकत्र्या) यांनी बहुमोल असे सहकार्य केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here