आता ओटीटी प्लॅटफॉर्म, ऑनलाईन न्यूजवर राहणार मंत्रालयाची नजर

0

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात मनोरंजनाचे महत्वाचे साधन ठरलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्म ऑनलाइन बातम्या आणि करंट अफेअर्स संदर्भातील माहितीवर आता माहिती व प्रसारण मंत्रालयाचे लक्ष असणार आहे. यासंबंधी एका अधिसूचना जारी करून माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकारने ऑनलाईन न्यूज पोर्टल, ऑनलाईन कंटेंट प्रोव्हायडर्सला माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारित येणार आहे. त्यामुळे आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सिनेमा आणि वेबसीरिजसारखा डिजिटल ऑडिओ व्हिज्यूअल कंटेंट, त्याचप्रमाणे ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरील बातम्यांचा कंटेट देखील मंत्रालयाच्या अखत्यारित येणार आहे.

सध्या डिजिटल कटेंटवर नियंत्रण ठेवणारा कोणताही कायदा किंवा स्वायत्त संस्था नाही. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने स्वायत्त मंडळाने ओटीटी प्लॅटफॉर्मचे नियमन करावे यासंदर्भातील याचिकेवर केंद्राचा प्रस्ताव मागविला होता. त्यानंतर केंद्र सरकारनं ओटीटी प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन न्यूज पोर्टल्स माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली आणण्याचा विचार सुरू केला होता. त्यानुसार, डिजिटल कंटेटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अंकुश ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:57 PM 11-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here