…तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अटक करणार का; सर्वोच्च न्यायालयात हरिश साळवेंचा सवाल

0

नवी दिल्ली : रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अंतरिम जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीत वकील हरिश साळवे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. काही दिवसांपूर्वी एसटीच्या कर्मचाऱ्याने वेतन न मिळाल्यामुळे आत्महत्या केली. मुख्यमंत्र्यांनी पगार न दिल्यामुळे या कर्मचाऱ्याला आत्महत्या करावी लागली. मग आता पोलीस उद्धव ठाकरे यांना अटक करणार का, असा सवाल अर्णव गोस्वामी यांचे वकील हरिष साळवे यांनी उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयात आज अर्णव गोस्वामी यांच्या अंतरिम जामिनासाठी सुनावणी होत आहे. यावेळी अर्णव गोस्वामी यांच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी युक्तिवाद केला. अर्णव गोस्वामी यांना ज्याप्रकारे अटक झाली, ती अटक करण्याची पद्धत आहे का? अशाप्रकारे अटक करायला अर्णव गोस्वामी हे खुनी किंवा दहशतवादी आहेत का, असा सवाल हरिष साळवे यांनी उपस्थित केला. हा सदोष मनुष्यवधाचा खटला नाही. अन्वय नाईक आत्महत्याप्रकरण मे 2020 पर्यंत शांत होते. त्यानंतर 21 एप्रिलला अर्णव गोस्वामी यांनी रिपब्लिक चॅनेलवरुन पालघरमधील साधुंच्या हत्येप्रकरणी राज्य सरकारवर टीका केली. यानंतर 26 एप्रिलला अन्वय यांच्या पत्नी अक्षता यांनी राज्य सरकारला तपास सुरु करण्यासंदर्भात पत्र लिहले. त्यामुळे याप्रकरणात राज्य सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे हरिष साळवे यांनी म्हटले. तसेच अन्वय नाईक यांनी त्यांच्या आईची हत्या करून आत्महत्या केल्याचेही हरिष साळवे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:35 PM 11-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here