तळीरामाने नशेच्या धुंदित पळवली भलतीच गाडी

0

चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून चिपळुणात दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच मंगळवारी सकाळी चिपळूण रेल्वे स्थानकाच्या परिसरात पार्किंग करून ठेवलेली दुचाकी चोरत असताना सतर्क नागरिकांनीच या चोरट्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, पोलीस चौकशीत हा प्रकार चुकून घडल्याचे समोर आले. दारूच्या नशेत असलेल्या या तरुणाने आपल्या गाडीची चावी चुकून दुसऱ्या गाडीला लागल्याचे सांगितले. पोलिसांची याबाबत खात्री पटताच त्याला सोडून देण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:36 PM 12-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here