लांजातील आठवडा बाजाराला थंड प्रतिसाद

0

लांजा : आठ ते नऊ महिन्यानंतर लांजा तालुक्याच्या ठिकाणी मंगळवारी भरविण्यात आलेल्या आठवडा बाजाराला ग्राहकांचा व जिल्ह्याबाहेरील व्यापाऱ्यांचा थंड प्रतिसाद लाभल्याने बाजारात म्हणावी तशी गर्दी दिसून येत नव्हती. सध्या दिवाळीचा सण व कोरोनाच्या रुग्णांमध्ये होणारी घट पाहता आठवडा बाजार सुरु करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात येताच सोमवारी प्रशासनाने मंगळवारी भरविण्यात येणाऱ्या आठवडा बाजाराला परवानगी दिल्याने मंगळवारी भरविण्यात येणारा आठवडा बाजार सुरु झाला आहे. मात्र एक दिवस आधी त्याबाबतची घोषणा केल्यामुळे त्याची माहिती व्यापारी तसेच ग्राहकांपर्यंत पोहोचली नसल्याने हा प्रतिसाद कमी असल्याचा अंदाज आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:40 PM 12-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here