दामले विद्यालयाने राखली उज्ज्वल यशाची परंपरा, शिष्यवृत्ती परीक्षेत आठ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

0

रत्नागिरी : फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दामले विद्यालय, रत्नागिरी नगर परिषद शाळा क्रमांक 15 या शाळेचे तब्बल आठ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत. या शाळेतील पंचवीस विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते त्यापैकी जिल्हा गुणवत्ता क्रमांक प्राप्त विद्यार्थी पुढील प्रमाणे :
1) श्रेया गंगाराम मुदगल जिल्ह्यात 11 वी
2) दत्तप्रसाद संदीप मुळये जिल्ह्यात 31 वा
3) मुग्धा संतोष लिंगायत जिल्ह्यात 68 वी
4) शिवकन्या गजानन जाधव जिल्ह्यात 88वी
5) सुयश मोहन आसबे जिल्ह्यात 103 वा
6) जयेश अरुण गोरे जिल्ह्यात 112 वा
7) गौरव प्रकाश गोरे जिल्ह्यात 113 वा
8) अभिषेक लक्ष्मण हनबर जिल्ह्यात 114 वा
वरील विद्यार्थ्यांना दामले विद्यालय शाळेतील सौ. श्रद्धा निरंजन गांगण व श्री. योगेश दत्ताराम कदम या शिक्षकांनी मार्गदर्शन केले व शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रकाश भिकाजी जाधव यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना वेळोवेळी प्रेरणा दिली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:12 AM 13-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here